Home Breaking News ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ऐतिहासिक शपथविधी; २०३ शाळा महाविद्यालयांमधील...

‘नशामुक्त युवा भारत अभियान’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ऐतिहासिक शपथविधी; २०३ शाळा महाविद्यालयांमधील तरुणांचा अमली पदार्थांविरोधात एल्गार!

चंद्रपूर :- चंद्रपूर हादरले! व्यसनाधिनतेविरोधात पोलिस दलाचा महा-हुंकार; तब्बल ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी उतरले मैदानात. तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांच्या (Drugs) विळख्याविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आता थेट आणि आक्रमक पावले उचलली आहेत. चंद्रपूर पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘नशामुक्त युवा भारत अभियान’ या धडक उपक्रमांतर्गत आज जिल्हातील तब्बल २०३ शाळा व महाविद्यालयांमधील ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी नशविरुद्धच्या लढ्यात सरसावले. विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची आणि नशामुक्त समाज घडविण्याची शपथ घेत नशेच्या विरोधात मोठा एल्गार पुकारला आहे.



प्रमुख मान्यवरांची प्रभावी उपस्थिती व मार्गदर्शन
सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर 💥चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण शपथविधी पार पडला.
शिवाजी हायस्कूल, राजुरा💥 राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार  श्री. देवराव भोंगळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी नशेविरोधी शपथ घेतली.
बी.जे.एम. कार्मेल्स अकॅडमी, चंद्रपूर💥 चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी  श्रीमती वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे घातक दुष्परिणाम समजावून सांगितले व शपथेचे धडे दिले.
खत्री कॉलेज, चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या उपस्थितीत येथे विद्यार्थ्यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केला.



🙏 मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये 🙏
महा-आंदोलनाचे स्वरूप :– या अभियानात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, अंमलदार, मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक जनप्रतिनिधी (नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच) आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याने या मोहिमेला एका जनआंदोलनाचे रूप प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांचा दृढ संकल्प :-‘नशामुक्त युवा, सशक्त भारत’ या संकल्पनेवर ठाम विश्वास ठेवत विद्यार्थ्यांनी स्वतः नशा न करण्याचा तसेच आपला समाज आणि मित्र परिवारात जनजागृती करण्याचा वजրमुठ निर्धार व्यक्त केला.
पोलिसांचा कडक इशारा :- विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेविरुद्ध जाणीव निर्माण करणे आणि त्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवून एक निरोगी, सुरक्षित पिढी घडविणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चंद्रपूर पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील युवक व विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यातून कायमचे दूर ठेवण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारची कडक जनजागृती, शपथ व प्रतिबंधक मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.