Home जिल्हा प्रणय मत्ते यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सत्कार सोहळा उत्साहात संपन्न ISF वर्ल्ड स्कूल...

प्रणय मत्ते यांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सत्कार सोहळा उत्साहात संपन्न ISF वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल गौरव.

भद्रावती :- इंटरनॅशनल स्कूल स्पोर्ट फेडरेशन (ISF) आयोजित वर्ल्ड स्कूल गेम्स अंडर-18 व्हॉलीबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे श्री. प्रणय मत्ते यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनव आदिवासी शारीरिक व शिक्षण मंडळाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
चीनमधील शांगलुओ येथे जुलै २०२६ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रणय मत्ते यांनी भारताचे प्रतिनिधित्व करून आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सुरेश पाचपोर यांच्या पुढाकाराने त्यांचा गौरव करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास नगरसेवक नरेंद्र पढाल, संजय पारधी, सरताज शेख यांच्यासह संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रणय मत्ते यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या