Home जिल्हा पीएम श्री शाळेत आनंदवन सामाजिक कार्यकर्ते सूरज चिमुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याना शैक्षणिक...

पीएम श्री शाळेत आनंदवन सामाजिक कार्यकर्ते सूरज चिमुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

आनंदवन :-पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन येथे नुकताच सामाजिक कार्यकर्ते सूरज चिमुरकर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व 240 विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी त्यांना केळी व कॅडबरी चॉकलेटचेही वितरण करण्यात आले.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. श्रीकांत बोथले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजित मणियार, सचिव अभिजित बोथले, कोषाध्यक्ष सुनील अयाचित, अमित लाहोटी, दुग्गड, तसेच श्री. शुभम चिमुरकर, वाढदिवसकर्ते सूरज चिमुरकर, चिमुरकर काकाजी व त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नागजी साळवे यांनी प्रास्ताविक सादर करून कार्यक्रमाच्या भूमिकेची सविस्तर माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहभाग घेतला. यामध्ये वंदना गायकवाड, अनामिका आत्राम, रोहिणी अनिवाल, अर्चना धावस,  उर्मिला बंदूकवार (नलघंटीवार) , आदित्य दवे आणि मिनाल जानवे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री. विजय बंडूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती अनामिका आत्राम यांनी मानले. उपस्थितांनी सूरज चिमुरकर यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयु्र्ल्याची व पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.