माजरी :- दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था , सावंगी मेघे अंतर्गत संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. नंदभाऊ सुर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, माजरी (रं.नं. ५४२) यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. नंदभाऊ सुर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका भव्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने आयोजित ‘भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर’, ‘मोफत आरोग्य तपासणी’ तसेच ‘रक्तदान शिबिराला’ नागरिकांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभनार असुन.
कुचना सामुदायिक भवन, डब्लूसीएल कॉलनी येथे पार पडनार असुन या शिबिरामध्ये परिसरातील सर्वसामान्यांपर्यंत उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यात येनार व तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मोफत औषधोपचार प्रदान करनार आहे.
💠 कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये व आयोजन 💠
💥 दिनांक २८ जुलै २०२६, मंगळवार
👉 वेळ :- सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
स्थळ :- कुचना सामुदायिक भवन, डब्लूसीएल कॉलनी
🙏 सहयोग :- आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) व स्व. नंदभाऊ सुर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, माजरी
🙏आयोजक व मार्गदर्शन 🙏
श्री. किसन सुर (संचालक, साई नागरी सह. पतसंस्था मर्या. चंद्रपूर) आणि सौ. अमृताताई सुर (माजी बाल कल्याण सभापती, जि.प. चंद्रपूर) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व कुशल नेतृत्वाखाली हा यशस्वी सामाजिक उपक्रम पार पडनार आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जावे, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.




