Home महाराष्ट्र दिव्यांगांसाठी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ सुरू, आता सर्व योजना एका क्लिकवर !

दिव्यांगांसाठी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ सुरू, आता सर्व योजना एका क्लिकवर !

मुंबई :- महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने दिव्यांगांच्या कल्याणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, आता ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल‘ अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आले आहे.




💠 या निर्णयाची मुख्य वैशिष्ट्ये 💠
एका क्लिकवर सुविधा :- आतापर्यंत दिव्यांगांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत होते. मात्र, आता या नवीन पोर्टलमुळे शासनाच्या सर्व योजनांची माहिती आणि लाभ दिव्यांगांना केवळ एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.




💠 पारदर्शकता आणि वेग 💠या डिजिटल पुढाकारामुळे सरकारी कामात पारदर्शकता येईल आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्याचा वेग वाढेल.




💠 शासनाचा मोठा निर्णय 💠 :-दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी या पोर्टलच्या निर्णयाची घोषणा केली असून, हा निर्णय दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. आता दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या योजनांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तर ते थेट या पोर्टलच्या माध्यमातून आपला हक्क मिळवू शकतील.