वरोरा :- अभिषेक किशोर भागडे
शहरातील वांद्रे ले-आउट परिसरातील मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाढलेले अतिक्रमण, रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे येथील नागरिक कमालीचे संतापले आहेत. या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि पोलीस स्टेशनला निवेदन देऊन ‘आमरण उपोषणा’ चा इशारा दिला आहे.
नेमकी समस्या काय ?
निखिल विजय कोरटकर आणि परिसरातील इतर रहिवाशांनी दिलेल्या निवेदनानुसार, रेल्वे गेट जवळ आणि १ ते १५ समोरील सर्व्हिस रोडवर अनधिकृत बांधकामे करून रस्ता अडवण्यात आला आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून रस्त्याच्या कडेला नादुरुस्त जेसीबी आणि अवजड यंत्रसामग्री पडून आहे.
🛑 नागरिकांनी मांडलेले प्रमुख मुद्दे 🛑
👉 अपघातांचे सत्र :- रस्ता अरुंद झाल्यामुळे आणि मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
👉 गुंडगिरी आणि अरेरावी :- येथील गॅरेज मालक आणि दुकानदार नागरिकांशी अश्लील भाषेत बोलतात, शिवीगाळ करतात आणि दमदाटी करतात, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
👉 वाहतुकीला अडथळा :- सर्व्हिस रोडवर दुकाने आणि गॅरेज थाटल्यामुळे रहिवाशांना ये-जा करणे कठीण झाले आहे.
👉 प्रशासनाचे दुर्लक्ष :-गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही नगर परिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
🛑 नागरिकांच्या प्रमुख मागण्या 🛑
१. सर्व अनधिकृत अतिक्रमणे त्वरित हटवण्यात यावीत.
२. मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड पूर्णपणे मोकळा करण्यात यावा.
३. रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून रस्त्याची दुरुस्ती करावी.
४. रस्ता अडवून ठेवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
“जर या विषयावर तातडीने कारवाई झाली नाही, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करावे लागेल. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अपघाताला किंवा वादाला पूर्णपणे नगर परिषद प्रशासन जबाबदार असेल.”
रहिवाशांचा इशारा :- या निवेदनाची प्रत आमदार, नगर परिषद नगराध्यक्ष आणि मुख्य अभियंता पोलीस स्टेशन यांनाही पाठवण्यात आली आहे. यावर आता प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तुकाराम जिवतोडे, अंतता दाभेणकर, संजय शोरकार, निखिल कोरटकर, मधुकर पिंजरकर व इतर नागरिक.
🙏 जय विदर्भ🙏




