⭕🙏 नागपूरचे वेगाने वाढते आर्थिक पाऊल- जागातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात जलद प्रगती करणारे शहर🙏⭕

✍️ अभिषेक भागडे,वरोरा

नागपूर : विदर्भाची उपराजधानी असलेल्या नागपूरने आर्थिक विकासाच्या नव्या उंची गाठण्यास सुरुवात केली असून, जागतिक स्तरावरही या शहराची प्रगती वेगाने अधोरेखित होत आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार 2019 ते 2035 या कालावधीत नागपूर हे जगातील पाचवे सर्वात वेगाने वाढणारे शहर ठरणार आहे. विशेष म्हणजे 2027-28 पर्यंत नागपूरचा GDP तब्बल ₹3.5 लाख कोटींच्या घरात पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांची वाढती संख्या — महाराष्ट्र देशातील अग्रभागी

महाराष्ट्रातील नागरिक आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक होत असून, सिक्युरिटीज मार्केटमध्ये त्यांचा प्रवेश देशात सर्वाधिक आहे.

राज्यातील गुंतवणूकदारांचा सिक्युरिटीज मार्केट उत्पादनांमध्ये 17% इतका वाटा आहे.

राज्यात सुमारे 272 लाख डिमॅट खाती असून, ही संख्या देशातील एकूण खात्यांच्या 16.2% इतकी आहे.

उत्पादन क्षेत्र, व्यापार, सेवा उद्योग आणि डिजिटलायझेशन यामुळे नागपूरचा आर्थिक वेग वाढत आहे. शहरातील पायाभूत सुविधा आणि आयटी क्षेत्रात होत असलेल्या गुंतवणुकीमुळे रोजगार, उद्योग आणि नवीन आर्थिक संधी निर्माण होत आहेत.

SEBI च्या सर्वेक्षणातून उघड झालेली महत्त्वाची बाब — गुंतवणूकदार शिक्षणाचा अभाव

2025 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांनी घेतलेल्या सर्वेक्षणातून एक गंभीर वास्तव समोर आले.
सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या 53,357 पैकी एक टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी भांडवली बाजाराशी संबंधित कोणत्याही प्रशिक्षणात सहभाग घेतल्याचे नमूद केले आहे.

अनेक सहभागी लोकांनी—

बाजार कसा कार्य करतो,

गुंतवणूक कशी सुरू करावी,

धोका व्यवस्थापन काय आहे,

याबद्दल मूलभूत ज्ञानच नसल्याचे सांगितले. गुंतवणुकीची इच्छा असली तरी योग्य मार्गदर्शनाचा अभाव हा मोठा अडथळा असल्याचे स्पष्ट झाले.

ASTA ने घेतली पुढाकार — 60,000+ गुंतवणूकदारांना दिले प्रशिक्षण

या गरजेतूनच अस्तित्वात आलेली अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी (ASTA) आज नागपूरसह महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांसाठी एक दिशा दर्शक ठरत आहे.
आजवर 60,000 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन ASTA ने त्यांना सक्षम गुंतवणूकदार बनविण्यात मदत केली आहे.

याचा सकारात्मक परिणाम अनेकांच्या जीवनात पाहायला मिळतो—

प्रकाश गमोटे सांगतात :
“सोशल मीडियामुळे बाजाराविषयी आकर्षण होते, पण नुकसानीची भीती वाटायची. ASTA मध्ये शिक्षण घेतल्यावर आत्मविश्वास वाढला आणि आर्थिक स्थैर्याकडे जाण्याचा मार्ग मिळाला.”

पदवीधर मनोज मेनन म्हणतात :
“ASTA ने दिलेले प्रात्यक्षिक प्रशिक्षण, शिस्त आणि मार्केटची समज यामुळे फक्त गुंतवणूक नाही तर ‘शहाणपणाची गुंतवणूक’ कशी करावी हे कळले.”

नागपूर: आर्थिक वाढीसह गुंतवणूक संस्कृतीचा बेताल विकास

नागपूरमध्ये पायाभूत सुविधा, उद्योग, आयटी पार्क, लॉजिस्टिक्स हब आणि ज्ञान क्षेत्राचा संगम होत असताना, शहराचा विकास फक्त GDP वाढीपुरता मर्यादित नाही.
लोकांना संपत्ती निर्माण करण्याची क्षमता, आर्थिक स्वावलंबन आणि वित्तीय साक्षरता देण्यासाठीही महत्त्वपूर्ण वातावरण तयार होत आहे.

नागपूरचा विकास आणि राज्यातील गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक पायाभरणी अधिक मजबूत होत असून, देशाच्या प्रगतीत नागपूर एक प्रेरक शक्ती बनत आहे.

—🙏 जय विदर्भ🙏— बातमी आणि जाहिराती करता संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️ 8329889732