Home राष्ट्रीय Paris Olympics 2024 : मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी

Paris Olympics 2024 : मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी

Paris Olympics 2024 : मनू भाकरची ऐतिहासिक कामगिरी
Paris Olympics 2024 : Manu Bhakar

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलंवहिलं पदक

पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) स्पर्धेतून भारतासाठी सर्वात मोठी आणि या क्षणाची आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाचं खातं उघडलं आहे. महिला नेमबाज मनु भाकर हीने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे. मनुने यासह इतिहास रचला आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनुने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलं. मनुला रौप्य पदकाची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. मात्र त्यानंतरही भारताला पहिलं पदक मिळाल्याने आनंदाचं वातावरण आहे. मनु भाकर हीने 2020 मध्ये टोक्यो ऑलिम्पिकमधून पदार्पण केलं होतं. मात्र तेव्हा मनु अपयशी ठरली होती. मनुला तेव्हा 12 व्या स्थानी समाधान मानावं लागल्याने तिचं आव्हान संपुष्टात आलं. मात्र तिने जोरदार कमबॅक करत आता पदक मिळवलंय.

मनु भाकरला (Manu Bhakar) रौप्य पदक मिळवण्याची संधी होती, मात्र ती थोडक्यात हुकली परिणामी पदकाचा रंग बदलला. या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कोरियाच्या ओह ये जिन हीने सुवर्ण पदक मिळवलं. तर कोरियाच्या की ही किम येजी हीने रौप्य पदक पटकावलं. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाळी. दोघींच्या पॉइंट्समध्ये फक्त 2चा फरक होता. कोरियाच्या या दोघींनी अुनुक्रमे 243.2 आणि 241.3 असा स्कोअर केला. टोक्या ऑलिम्पिक स्पर्धेत मनुच्या पिस्तुलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मनुला फक्त 14 शॉट लावता आले. परिणामी मनु फायनलसाठी पात्र ठरली नाही. मात्र मनुने अथक प्रयत्नांनी तिने कांस्य पदक (Bronze medal) मिळवलंय.

Paris olympics 2024 wikipedia
Paris Olympics 2024 tickets
Winter Olympics 2024
Paris 2024 schedule PDF
Paris Olympics schedule
Next Olympics 2028
2024 Olympics held in which country
Summer Olympic Games