28 November 2026News Website

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महिला भजन स्पर्धा २०२६–२७; उत्कृष्ट महिला भजन मंडळाचा प्रथम क्रमांक, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित महिला भजन स्पर्धा २०२६–२७ मध्ये उत्कृष्ट महिला भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले असून, या कामगिरीमुळे मंडळाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हा स्पर्धात्मक कार्यक्रम दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी ललित कला भवन, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.



स्पर्धेदरम्यान सादर करण्यात आलेल्या अभंग, गौळण आणि भैरवीने रसिक व परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत उत्कृष्ट गायिका म्हणून रश्मी हिवरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच हार्मोनियम वादक श्री. प्रवीण ढगे आणि तबला वादक तन्मय मडावी यांनाही पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.



उत्कृष्ट महिला भजन स्पर्धेत सौ. छबूताई वैरागडे, गायिका रश्मी हिवरे, स्नेहल बांगडे, अर्चना येरने, योगिता पोडे, प्रतिभा थेरे, प्रियंका बेंद्रे, चंदा घोडमारे, दीप्ती रायचुरा आणि सरिता पोटदुखे या सदस्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आयोजकांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

अभिषेक किशोर भागडे