11 November 2026News Website

वरोरा–माढेळी–नागरी मार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात माजी सैनिक सचिन धात्रक आक्रमक; मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी जोरदार मागणी!

वरोरा :- वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा वरोरा–माढेळी–नागरी हा मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला आहे. या मार्गावरून परिसरातील अनेक गावांतील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण व मजबूतीकरण होणे अत्यंत आवश्यक असल्याची आक्रमक मागणी माजी सैनिक सचिन धात्रक यांनी केली आहे.



सध्या या मार्गावरील रस्त्यालगतच्या नाल्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून अनेक ठिकाणी नाले फुटले आहेत. यामुळे पाणी निचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच इलेक्ट्रिक केबलच्या कामामुळे रस्त्याचे व परिसराचे झालेले नुकसान आणि या मार्गावर सतत वाढणारे अपघातांचे प्रमाण यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे माजी सैनिक सचिन धात्रक यांनी म्हटले आहे.

🙏 प्रमुख मागण्या व उपाययोजना 🙏

वरोरा–माढेळी–नागरी मार्गाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी माजी सैनिक सचिन धात्रक यांनी प्रशासनाकडे खालीलप्रमाणे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे:

  • HAM / PPP योजना :- वरोरा–माढेळी–नागरी मार्गाचा HAM (Hybrid Annuity Model) किंवा PPP (Public-Private Partnership) योजनेअंतर्गत सर्वांगीण विकास करण्यात यावा.
  • नाल्यांची पुनर्बांधणी :- रस्त्यालगत फुटलेल्या व दयनीय झालेलेल्या नाल्यांची तातडीने पुनर्बांधणी करून पाणी निचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा.
  • नुकसानीची चौकशी :- इलेक्ट्रिक केबलच्या कामामुळे रस्त्याचे आणि परिसराचे जे नुकसान झाले आहे, त्याची कसून चौकशी करण्यात यावी.
  • अडकलेली कामे व सुरक्षा :- मार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी तातडीने अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवून नागरिकांच्या जीविताची सुरक्षा निश्चित करण्यात यावी.

विकासकामांच्या नावाखाली होणारे हाल आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, माजी सैनिक सचिन धात्रक यांनी उचललेल्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला तातडीने पावले उचलणे भाग पडणार आहे. लवकरात लवकर या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे.

अभिषेक किशोर भागडे