11 November 2026News Website

घाटंजी येथे मा. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त हळदीयुक्त दूध वाटपाचा सामाजिक उपक्रम!

” आरोग्याचा अनोखा संदेश देत उत्साहात पार पडला वाढदिवस सोहळा; कार्यकर्त्यांकडून ‘भैयां’ना दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा “

घाटंजी :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घाटंजी येथे अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात हळदीयुक्त दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजकीय उत्सवांपेक्षा सामाजिक बांधीलकी जपण्यावर नेहमीच भर देणाऱ्या हंसराजभाऊंच्या विचारांचा वारसा चालवत कार्यकर्त्यांनी या उपक्रमातून संपूर्ण तालुक्याला आरोग्याचा एक महत्त्वाचा आणि सुंदर संदेश दिला.

जनसामान्यांचे नेते म्हणून ख्याती असलेले हंसराजभाऊ अहीर यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. केवळ घोषणाबाजी न करता, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या विधायक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

याप्रसंगी उपस्थितांनी मा. हंसराजजी अहीर यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. घाटंजी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या सामाजिक सोहळ्याला उपस्थित होते.

 केळापूर विधानसभा क्षेत्राची लोकप्रिय आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम…

” घाटंजीच्या मातीमध्ये वाढदिवसाचा थाट, हळदीयुक्त दुधाने दाखवली आरोग्याची वाट!

जनसेवेचा ध्यास ज्यांचा, नाव ‘हंसराजभाऊ’, त्यांच्या दीर्घायुष्याची देवाकडे प्रार्थना गाऊ!

सामाजिक बांधीलकीचा दिला आज संदेश, अशा लोकनेत्याला वंदन करिते अखंड देश!

अभिषेक किशोर भागडे