7 November 2026News Website

राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पासह चंद्रपुरात उत्साहात पार पडले ‘मन की बात’चे श्रवण

चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी) :- देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या अत्यंत लोकप्रिय व जनसंवादाचे माध्यम ठरलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आज चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्य वातावरणात सामूहिक श्रवण करण्यात आले. या कार्यक्रमास वरोरा-भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांची  उपस्थिती लाभली.



‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान देशातील नागरिकांशी थेट संवाद साधतात. यात विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्ती, नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम, नवनवीन कल्पना  देशाची प्रगती आणि जनसहभागातून घडणाऱ्या सकारात्मक कार्यांवर ते विशेष प्रकाश टाकतात. या संवादातून समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणा मिळते आणि राष्ट्राच्या विकासात आपले योगदान देण्याची भावना अधिक दृढ होते.



या विशेष कार्यक्रमास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली.

  • मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी अर्थ व सांस्कृतिक मंत्री तथा आमदार)
  • मा. श्री. करणदादा देवतळे (आमदार, वरोरा-भद्रावती)
  • मा. श्री. देवरावभाऊ भोंगळे (आमदार)
  • मा. श्री. हरीशजी शर्मा (जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी)

यांच्यासह भाजपचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या विकासाचा संकल्प अधिक दृढ करत, जनसेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांना समर्पित अशा या संवाद कार्यक्रमात सहभागी होण्याचा वेगळाच आनंद आणि उर्जा उपस्थितांनी व्यक्त केली.

अभिषेक किशोर भागडे