वरोरा :-दि. २२ ऑक्टोबर २०२६ : लोक शिक्षण संस्था, वरोडा संचालित लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील इंग्रजी विभागाच्या वतीने इंग्लिश लिटररी क्लबचे उद्घाटन आणि ‘Tragedy and Melodrama’ या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या, तर आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अरविंद एन. बर्डे हे उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ. श्रीकांत पुरी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून डॉ. बर्डे यांचा परिचय करून दिला. डॉ. बर्डे यांनी इंग्लिश लिटररी क्लबच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली. त्यानंतर त्यांनी ‘Tragedy and Melodrama’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी या नाट्यप्रकारांचे स्वरूप, वैशिष्ट्ये तसेच मानवी भावना, संघर्ष आणि जीवनानुभव व्यक्त करण्यात त्यांचे महत्त्व विशद केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी नाट्यसाहित्य समजून घेण्यास उपयुक्त दृष्टिकोन मिळाला.
याप्रसंगी इंग्लिश लिटररी क्लबच्या अध्यक्षा जयश्री राखुंडे, सचिव नीलिमा आपटे तसेच क्लबच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सदस्यांमध्ये पल्लवी कांबळे, भूमिता राऊत, गौरी काटकोजवार, सारिका विंचूलकर, विशाखा टाले, मानसी डाहुले, शुभांगी चवले, अचल उमरे, समृद्धी चौधरी, सानिया सोनारकर, वैष्णवी काळे, धनश्री हनुमंते, प्रणाली लिपटे आणि अश्विनी टाले यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा व साहित्याविषयी आवड निर्माण करणे, त्यांची संवादकौशल्ये विकसित करणे, वाचन-लेखनाला प्रोत्साहन देणे आणि सर्जनशील अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा इंग्लिश लिटररी क्लब स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध साहित्यिक उपक्रमांत सहभागी होण्याची आणि आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन इंग्रजी विषयाच्या मेजर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी केले. विशाखा टाले आणि शुभांगी चवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर नीलिमा आपटे यांनी आभारप्रदर्शन केले. प्रा. अलका कुलकर्णी यांच्यासह इंग्रजी विभागातील इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.





