Home महाराष्ट्र मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पाच्या चरणी लीन झाले आ. प्रा. राजूभाऊ तोडसाम;...

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर बाप्पाच्या चरणी लीन झाले आ. प्रा. राजूभाऊ तोडसाम; लाडक्या बाप्पाचे घेतले दर्शन

मुंबई / पांढरकवडा (प्रतिनिधी):

“एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम् । विघ्ननाशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम् ॥”

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शासकीय ‘वर्षा’ निवासस्थानी आयोजित लाडक्या श्री गणपती बाप्पाच्या मंगलमय आरती सोहळ्याला राज्याचे अत्यंत आक्रमक व जनमानसात लोकप्रिय असलेले लोकप्रिय मा. आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी विशेष उपस्थिती लावली.

यावेळी लोकप्रिय आमदार तोडसाम यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत श्री गणपती बाप्पाची मनोभावे आरती करून राज्यभरात सुख, शांती, समृद्धी आणि शेतकरी-सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. विघ्नहर्त्याच्या दर्शनाने आणि बाप्पाच्या जयघोषाने ‘वर्षा’ निवासस्थानाचे वातावरण अतिशय भक्तीमय व चैतन्यदायी झाले होते.

राज्याच्या विकासाचा संकल्प डोळ्यांसमोर ठेवून अविरत कार्य करणाऱ्या नेतृत्वांच्या या स्नेहमेळाव्याने व बाप्पाच्या भक्तीने सर्वसामान्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी उपस्थितांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” असा जयघोष करत बाप्पाचा आशीर्वाद घेतला.