29 November 2026News Website

मांगुर्डा येथे संविधान दिन व क्रांतीवीर श्यामादादा कोलाम जयंती; आदिवासी सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

पांढरकवडा :- येथील मांगुर्डा येथे संविधान दिन व क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या नूतन आदिवासी सामाजिक सभागृहाचे लोकार्पणही लोकप्रिय आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले.क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांच्या स्मृतींना अभिवादन करत भारतीय संविधानाचे महत्त्व, सामाजिक एकता व आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्यात आली. या सभागृहामुळे विविध बैठका, कार्यक्रम व उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, समाजाच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व जनसेवेचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

अभिषेक किशोर भागडे