घाटंजी, दि. २६ नोव्हेंबर :- विदर्भातील ‘रॉबिनहूड’ म्हणून ओळखले जाणारे, आदिम कोलाम जमातीचे क्रांतिकारक व्यक्तिमत्त्व श्यामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त आज घाटंजी येथे त्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते हा नामफलक लोकार्पित करण्यात आला.
अन्यायाविरुद्धचा संघर्ष, समाजाप्रती असलेली निस्वार्थ निष्ठा आणि शोषितांच्या हक्कासाठी दिलेला लढा यांमुळे श्यामादादा कोलाम यांचा कार्याचा प्रेरणादायी वारसा आजही मार्गदर्शक ठरतो. त्यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना व कार्याला मानाचा मुजरा केला.या अनावरण सोहळ्याप्रसंगी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध मान्यवरांची उपस्थिती होती. श्यामादादा कोलाम यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या या नामफलकामुळे परिसरातील नव्या पिढीला त्यांच्या संघर्षाची माहिती मिळण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





