विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली: केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला असून चार प्रमुख केंद्रीय योजनांची नावे बदलण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले असून जोरदार वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावाने सुरू असलेल्या प्रमुख सरकारी योजनांमधून त्यांची नावे हटवण्यात आली आहेत. आता या सर्व योजनांची नावे बदलून ‘प्रधानमंत्री योजना’ अशा स्वरूपात करण्यात आली आहेत.
‘या’ योजनांची नावे बदलली
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना
- इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना
- राजीव गांधी / राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
केंद्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या या प्रमुख सामाजिक कल्याणकारी योजनांची नावे बदलून केंद्र सरकारने एक मोठा राजकीय आणि प्रशासकीय संदेश दिला आहे. गांधी घराण्याची नावे योजनांवरून हटवल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.





