7 November 2026News Website

शिवसेनेच्या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन; शिवसेना पदाधिकारी व हजारो शिवसैनिकांची उपस्थिती!

 भद्रावती :- शिवसेनेची वाढती ताकद आणि तडाखेबंद जनसंपर्क पुन्हा एकदा प्रखरपणे समोर आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे / अधिकृत शिवसेना) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत आणि जनसंपर्क अभियानात हजारोच्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या आक्रमक भूमिकेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.



सदर कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे स्थानिक नेतृत्व आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची दमदार उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये लोकसभा संपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि महिला आघाडी संपर्क प्रमुख उल्का विश्वासराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आगामी रणनीतीवर प्रकाश टाकला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात  उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, विधानसभा प्रमुख बंडू डाखरे, तालुकाप्रमुख नरेश काळे आणि शहर प्रमुख अतुल नंदे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणांमधून विरोधकांवर कडाडून टीका केली आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

तसेच महिला वर्गाचा वाढता सहभाग लक्षवेधी ठरला. महिला जिल्हा संघटिका भावना खोब्रागडे, तालुका संघटिका विभा बेहरे आणि शहर संघटिका अर्चना गमे यांनी महिला सैन्यात जोश भरण्याचे काम केले.

या भव्य जनआंदोलनात व शक्तिलढ्यात ज्ञानेश्वर डुकरे , बंडू चटपल्लीवार, गोलू गेडाम, पुरुषोत्तम नैताम यांच्यासह परिसरातील हजारोंच्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या महामेळाव्यामुळे संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेच्या वाघांचे वळण स्पष्टपणे जाणवू लागले असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा मोठा प्रभाव पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.आगामी जिल्हा परिषद पंचायत,समितीच्या निवडणुकी पार्श्वभूमी.
पदवीधर निवडणूक.संघटनात्मक बांधणी.साठी हा
कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला व हजारो शिवसैनिक उपस्थित राहीले.

 

अभिषेक किशोर भागडे