Home जिल्हा चंद्रपुरात रणरागिणी पतसंस्था व बचत गटाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व आदर्श नागरिकांचा...

चंद्रपुरात रणरागिणी पतसंस्था व बचत गटाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व आदर्श नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न.

चंद्रपूर :- रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि महिला बचत गटाच्या वतीने चंद्रपूर येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श नागरिकांच्या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवानी वडेट्टीवार उपस्थित राहून संवाद साधला. चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेविका चंदाताई वैरागडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या सुंदर व प्रेरणादायी कार्यक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
विविध क्षेत्रांत उत्तम यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही सदैव अग्रभागी राहून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चंदाताई वैरागडे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमात इतरांचा सत्कार करताना, खरंतर चंदाताईंच्याही कार्याचा आणि योगदानाचा विशेष गौरव व्हायला हवा होता, अशी भावना व्यक्त करत समाजासाठी त्या करत असलेल्या या सातत्यपूर्ण कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मा. आमदार अभिजितदादा वंजारी, मा. सर्वश्री श्यामबाबू पुगलिया, डॉ. इंदुताई अग्रवाल, ॲड. विजयऱाव ग. मोगरे, श्री. शिवाराव पोलशेट्टी, श्री. रामुभाऊ तिवारी, श्री. संतोषभाऊ कुचनकर, श्री. नरेंद्र बोबडे यांच्यासह चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.