वरोरा :- रोटरी क्लब वरोरा चे अध्यक्ष योगेश डोंगरवार यांना मानाचा “द्यानरत्न पुरस्कार” BEST PRESIDENT AWARDरो टरी डिस्ट्रिक्ट ३०३०च्या वर्ष २०२५-२६ मधील पुरस्कार सोहळ्यात रोटरी क्लब वरोरा क्लबचा गौरव रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 अंतर्गत असलेल्या 121 रोटरी क्लब्सच्या नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब वरोरा यांनी आपल्या वर्षभरातील जनोपयोगी व सेवाभावी कार्याची प्रभावी छाप उमटवत तब्बल ०८ मानाचे पुरस्कार प्राप्त केले.
रोटरी वर्ष २०२५-२६ या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून प्रथमच ०८ पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये सर्वोत्कृष्ट क्लब अध्यक्ष हा मानाचा पुरस्कार अध्यक्ष योगेश डोंगरवार यांना मिळाला तसेच सर्व रोटरी सदस्यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही अभिनंदनीय पावती ठरली आहे. वर्षभर सर्व सदस्यांनी केलेल्या एकत्रित कामाची पावती म्हणून हे सर्व बक्षीस क्लबला मिळाले.
१२१ क्लब्समधून विविध विभागांतील कार्याची घेतलेली ही पुरस्काररूपी दखल म्हणजे रोटरीच्या वर्षभराच्या निरंतर सेवाकार्याला मिळालेली कौतुकाची आणि प्रेरणेची मोठी शाबासकीच आहे.रोटरी क्लब वरोरा शहर, ग्रामीण सर्व स्तरातील, भागातील विविध शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम अशा अनेक सेवाकार्यातून वरोरा रोटरीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
‘सेवा हीच ओळख आणि समाजहित हेच ध्येय’ या भावनेतून कार्यरत असलेल्या रोटरीच्या सेवा कार्याची ही ०८ पुरस्कारांची दखल निश्चितच अभिमानास्पद आहे
क्लब ला मिळालेले पुरस्कार खालील प्रमाणे
1. 🏆 Best President Award – उत्कृष्ट अध्यक्षीय नेतृत्वाबद्दल मानाचा पुरस्कार.
2. 🏆 Trophy for Best Rotary–Rotaract Activity – रोटरी व रोटरॅक्ट यांच्यातील उत्कृष्ट समन्वय व संयुक्त उपक्रमांसाठी पुरस्कार.
3. 🏆 Trophy for Best Youth Month Activity – युवा शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या उत्कृष्ट उपक्रमांसाठी पुरस्कार.
4. 🏆 Trophy for Best Environment Award Project – पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या उल्लेखनीय प्रकल्पासाठी पुरस्कार.
5. 🏆 Trophy for Best Service for Youth – युवकांच्या विकासासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या उत्कृष्ट सेवाकार्यासाठी पुरस्कार.
6. 🏆 TRF Seminar आयोजनाबद्दल विशेष सन्मान – रोटरी इंटरनॅशनलच्या The Rotary Foundation (TRF) संदर्भातील महत्त्वपूर्ण सेमिनारचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गौरव.
7. 🏆 Highest Number Registered for District Conference – डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स साठी सर्वाधिक नोंदणी करून क्लबने केलेल्या उल्लेखनीय सहभागाबद्दल पुरस्कार.
8. 🏆 District Governor Appreciation Award – वर्षभरातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत जिल्हा प्रांतपालांकडून विशेष प्रशंसापत्र/पुरस्कार.
9. 🏆 President’s Enclave साठी सन्मानचिन्ह – रोटे समिर बाराई President’s Enclave उपक्रमातील उल्लेखनीय सहभागाबद्दल सन्मानचिन्ह.
10. 🏆 Assistant Governor सन्मानचिन्ह – रोटे अमित लाहोटी यांना सहाय्यक प्रांतपालांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट रोटरी कार्य केल्याबद्दल विशेष सन्मानचिन्ह.
या पुरस्कारांमुळे रोटरी क्लब वरोराच्या सामाजिक कार्याला जिल्हास्तरावर मोठी मान्यता मिळाली असून, क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सदस्यांच्या अथक परिश्रमाचे हे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, युवा विकास, सामाजिक सेवा, रोटरी फाउंडेशन तसेच विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून “Service Above Self” या रोटरीच्या मूलमंत्राला अनुसरून क्लबने वर्षभर सातत्यपूर्ण कार्य केले.
या यशाबद्दल रोटरी क्लब वरोराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सदस्यांचे, रोटरॅक्ट व इतर सहकारी संस्थांचे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन होत आहे.“पुरस्कार हे केवळ सन्मान नसून, समाजासाठी आणखी मोठे आणि प्रभावी कार्य करण्याची प्रेरणा आहेत,” अशी भावना रोटरी क्लब वरोराचे अध्यक्ष योगेश डोंगरवार व क्लब तर्फे वतीने व्यक्त करण्यात आली.




