भद्रावती :-नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त भारतीय जनता पार्टी, भद्रावती शहर व तालुकातर्फे शहरातील भाविक भक्तांसाठी ‘साबुदाणा खिचडी‘ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामाजिक उपक्रम १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता भद्रावती येथील गांधी चौकात पार पडणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. हंसराज भैय्या अहिर आणि वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा लोकप्रिय आमदार मा. श्री. करणदादा देवतळे हे उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.




