Home जिल्हा घुग्घुसमध्ये भक्तिमय वातावरणात कावड यात्रेचे भव्य स्वागत; नगरसेवक विवेक बोढेतर्फे भाविकांवर पुष्पवृष्टी...

घुग्घुसमध्ये भक्तिमय वातावरणात कावड यात्रेचे भव्य स्वागत; नगरसेवक विवेक बोढेतर्फे भाविकांवर पुष्पवृष्टी व सेवाकार्य!

घुग्घुस :- शहरात पवित्र श्रावण महिन्याच्या पर्वावर भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. ‘बोल बम’च्या जयघोषात आणि शिस्तीत निघालेल्या कावड यात्रेचे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता बसस्थानक चौकात नगरसेवक विवेक बोढे यांच्यातर्फे अत्यंत उत्साहात व जंगी स्वागत करण्यात आले.
‘बोल बम समिती’ घुग्घुसतर्फे वढा येथील त्रिवेणी संगमावरून पवित्र नदीचे जल घेऊन ही पायदळ कावड यात्रा मोठ्या श्रद्धाभावाने निघाली होती. यात्रा घुग्घुस बसस्थानक चौकात पोहोचताच संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘बोल बम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
यावेळी  नगरसेवक विवेक बोढे यांनी स्वतः पुढे सरसावत यात्रेत सहभागी झालेल्या हजारो शिवभक्तांचे भगवा दुपट्टा घालून स्वागत केले. तसेच प्रवासाचा थकवा दूर करण्यासाठी व आरोग्याची काळजी म्हणून भाविकांना पिण्याच्या पाण्याची बॉटल, ताजे फळ आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. भक्ती आणि समाजसेवेचा हा अनोखा संगम उपस्थितांचे मन जिंकणारा ठरला. घुगुस मार्गी  निघालेली ही कावड यात्रा पुढे वणी तालुक्यातील शिरपूर येथे विधीवत पूजेसह संपन्न (समापन) झाली.



🙏 या मान्यवरांची होती विशेष उपस्थिती 🙏
या धार्मिक व सामाजिक सोहळ्यात नगरसेवक विवेक बोढे यांच्यासह भाजपाचे गणेश कुटेमाटे, वसंता भोंगळे, सुरेंद्र भोंगळे, सुनील राम, सुनील श्रीवास, जयराज घोरपडे, संजय मानकर, शरीफ सिद्दीकी, तुलसीदास ढवस, रंगय्या पुरेल्ली, सचिन नांदे, अनिल गुप्ता, सुनंदा लिहीतकर, हनुमान खडसे यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.