Home जिल्हा भारतीय जनता पार्टी, वरोराच्या वतीने रमेश मेश्राम यांच्या नवनियुक्त पदाबद्दल भव्य सत्कार...

भारतीय जनता पार्टी, वरोराच्या वतीने रमेश मेश्राम यांच्या नवनियुक्त पदाबद्दल भव्य सत्कार संपन्न.

वरोरा (प्रतिनिधी) :-भारतीय जनता पार्टीच्या वतीने नुकत्याच जाहीर झालेल्या नियुक्त्यांमध्ये, रमेश मेश्राम यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती (ST) मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश (विदर्भ विभाग, जिल्हा चंद्रपूर) च्या सचिव पदी निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाची धुरा स्वीकारल्यानंतर आज त्यांचे वरोरा शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. वरोरा – भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आमदार करणदादा संजय देवतळे यांच्या पक्ष कार्यालयात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी पक्षातर्फे रमेश मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले.



कार्यक्रमादरम्या त्यांच्या वर नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच, ते आपल्या पदाला न्याय देत आदिवासी बांधवांच्या हितासाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
🙏 प्रमुख उपस्थिती 🙏
या सत्कार सोहळ्याला वरोरा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ बाबासाहेब भागडे, शहराचे शहराध्यक्ष व नगरसेवक  संतोष पवार , भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष  अनिकेत नाकाडे , तसेच अमित चावले, अजिंक्य नरडे, गजानन राऊत, प्रशांत उलमाले, अमित आसेकर, अभय मडावी, संजू राम, गणेश भिवदरे ,  खुशाल बावणे, दिलीप घोरपडे, निलेश तेला,  नगरसेविका सौ. आशा आसेकर , नगरसेविका नलीनी आत्राम यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर रमेश मेश्राम यांनी पक्षश्रेष्ठींनी व आमदार करणदादा देवतळे यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्याचे आणि संघटना अधिक मजबूत करण्याचे वचन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी नवनियुक्त सचिवांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.