Home जिल्हा स्व. नंदभाऊ सुर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आरोग्य शिबिरात सेवांचा महापूर 207 रुग्णांना...

स्व. नंदभाऊ सुर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य आरोग्य शिबिरात सेवांचा महापूर 207 रुग्णांना चष्मेवाटप, 400 रुग्णांची तपासणी,40 जणांचे रक्तदान.

माजरी :- स्व. नंदभाऊ सुर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुचना सामुदायिक भवन, डब्ल्यूसीएल कॉलनी येथे आयोजित भव्य सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) अंतર્ગत संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि स्व. नंदभाऊ सुर बहुउद्देशीय सामाजिक संस्था माजरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा लोकोपयोगी कार्यक्रम पार पडला.



श्री. किसन सुर (संचालक, साई नागरी सह. पतसंस्था मर्या. चंदपूर) आणि सौ. अमृताताई सुर (माजी बाक कल्याण सभापती जि.प. चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात सामाजिक जबाबादारीचे सुंदर दर्शन घडले.



🙏 शिबिराची ठळक वैशिष्ट्ये 🙏
🩸भव्य रक्तदान :- सामाजिक जाणीवेतून तरुणांनी पुढे येत तब्बल  40 नागरिकांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.
💥 रुग्ण तपासणी :- परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 207 लोकांना चष्मे वाटप करण्यात आले व 400 सामान्य रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी व निदान करण्यात आले.



💥 मोफत चष्मे व साहाय्य :- गरजूंना डोळ्यांच्या तपासणीनंतर मोफत चष्मे वाटप करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमधून समाधान व्यक्त होत आहे.
“मानवता हीच खरी ईश्वरसेवा असून, स्व. नंदभाऊ सुर यांच्या विचारांना अशीच समाजकार्याची जोड देऊन गरिबांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हाच आमचा खरा उद्देश आहे. 🙏