Home जिल्हा शिक्षणसेवा हीच राष्ट्रसेवा’: वरोरा-भद्रावतीचे लाडके आमदार करणदादा देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य...

शिक्षणसेवा हीच राष्ट्रसेवा’: वरोरा-भद्रावतीचे लाडके आमदार करणदादा देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम!

वरोरा :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी, तरुण आणि तडफदार आमदार मा. श्री. करणदादा संजयजी देवतळे यांचा वाढदिवस संपूर्ण मतदार संघात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याच औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चाचे सक्रिय नेतृत्व अनिकेत भाऊ नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पुढाकाराने एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.




शिक्षणसेवा हीच राष्ट्रसेवा‘ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून, वरोरा शहरातील सर्व नगरपरिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे आमदार करणदादा देवतळे यांचा वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करून आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
युवा नेतृत्वाचा आक्रमक पुढाकार
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ‘करणदादा देवतळे मित्र परिवार’ आणि ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत नाकाडे यांनी या उपक्रमाच्या नियोजनासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांची कार्यतत्परता कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारी ठरली आहे. जनसेवेच्या या कार्यात युवा पिढीने दाखवलेला सहभाग, आमदार महोदयांवरील त्यांचे प्रेम आणि निष्ठा अधोरेखित करतो.
केवळ घोषणाबाजी न करता, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करणारा हा उपक्रम वरोरा परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, अनिकेत नाकाडे यांच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🙏 आयोजक 🙏
करणदादा देवतळे मित्र परिवार व भारतीय जनता युवा मोर्चा, वरोरा.