वरोरा :-
स्थानिक संस्कार भारती पब्लिक स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांसाठी पहिल्यांदाच ‘पदवी प्रदान समारंभ’ (Graduation Ceremony) अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. जेव्हा नर्सरी ते युकेजीचे विद्यार्थी पदवीचा गणवेश (Degree Gown) परिधान करून मंचावर आले, तेव्हा उपस्थित पालकांना आपल्या पाल्यामध्ये भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर आणि जिल्हाधिकारी असल्याचे प्रतिबिंब उमटताना दिसले.
विद्यार्थ्यांच्या 👉शैक्षणिक प्रवासातील सुवर्णक्षण
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपेक्षा मालू होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेच्या प्राचार्या राणी पटेल , उपप्राचार्या श्रद्धा चौबे तसेच मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. पदवी प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड मानला जातो. याच भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या मंचावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
🔴 पालकांचा भावूक प्रतिसाद 🔴
आपल्या लहानग्यांना सन्मानाने पदवी घेताना पाहून पालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पदवी मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना पालकांनी शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.
🔴 प्राचार्यांचे मौलिक मार्गदर्शन 🔴
प्राचार्या राणी पटेल यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर प्रकाश टाकला. पूर्व प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भविष्याचा पाया असून, अशा उपक्रमांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले.
🔴 कार्यक्रमाची यशस्वी सांगता 🔴
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती शास्त्रकार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार उज्वला झंजल यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सारिका दातारकर, भाग्यश्री फेथफुलवार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
🙏 जय विदर्भ 🙏




