वरोरा :- समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची आणि ज्ञानाची समान संधी मिळावी, या उदात्त हेतूने “रोटरी क्लब वरोरा तर्फे एक कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये अद्याप वाचनालयाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन संजीवनी’ हा विशेष वाचनालय उपक्रम राबविण्यात येत आहे.तुमच्या घरातील पुस्तके ठरणार विद्यार्थ्यांचे भविष्य अनेकदा आपल्या घरी शालेय पुस्तके, कथा, कादंबऱ्या किंवा स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचून झाल्यानंतर कोपऱ्यात पडून राहतात. हीच पुस्तके एखाद्या गरजू विद्यार्थ्यासाठी ज्ञानाची नवी दिशा ठरू शकतात. याच भावनेतून रोटरी क्लबने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या घरातील खालील प्रकारचे साहित्य दान करावे:
👉 शालेय पुस्तके
👉 कथा आणि कादंबऱ्या
👉 स्पर्धा परीक्षा पुस्तके
👉 ज्ञानवर्धक साहित्य
💥’ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’💥
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि त्यांच्या भविष्यातील यशाचा पाया भक्कम करणे हा आहे. “तुमच्या एका पुस्तकाने एखाद्या विद्यार्थ्याचे जीवन बदलू शकते,” असा विश्वास रोटरी क्लबने व्यक्त केला आहे. ‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’ मानून वरोरा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
💥पुस्तक संकलन सुरू💥
सध्या पुस्तक संकलनाचे काम वेगाने सुरू असून, इच्छुक देणगीदारांनी अधिक माहितीसाठी किंवा पुस्तक जमा करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
👉 संपर्क :-योगेश न. डोंगरवार (अध्यक्ष रोटरी क्लब वरोरा)
“आपल्या छोट्याशा सहकार्याने अनेक विद्यार्थ्यांचे मोठे स्वप्न पूर्ण होईल!”या जिद्दीने रोटरी क्लब वरोराची टीम या मोहिमेत उतरली आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




