वरोरा (स्वतंत्र विदर्भ न्यूज) :- अभिषेक भागडे
स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविणाऱ्या संस्कार भारती पब्लिक स्कूलने यंदाच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.यशाची आकडेवारी अदिती गायकवाड वरोरा तालुक्यातून 96.00.% घेउन प्रथम स्थान पटकावले यावर्षी संस्कार भारती पब्लिक स्कूलमधून एकूण ९० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे, सर्वच्या सर्व ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेने आपला १०० टक्के निकालाचा निकाल कायम राखला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी (Distinction)प्राप्त करून विशेष यश संपादन केले आहे.
👉 गौतुक आणि सत्कार
या घवघवीत यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात त्यांच्या कष्टासोबतच शाळेचे नियोजनबद्ध अध्यापन आणि पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
🙏स्वतंत्र विदर्भ न्यूज पोर्टल, वरोरा तर्फे शुभेच्छा 🙏
“यशाचे शिखर गाठणाऱ्या संस्कार भारती पब्लिक स्कूलच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमचे भविष्य उज्ज्वल असो आणि तुम्ही अशाच प्रकारे यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावीत, हीच सदिच्छा.
🙏 जय विदर्भ🙏




