Home जिल्हा वरोरा येथे श्री स्वामी समर्थ महाराज निजानंद दिन सोहळ्याचे आयोजन; विविध धार्मिक...

वरोरा येथे श्री स्वामी समर्थ महाराज निजानंद दिन सोहळ्याचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.

वरोरा : – येथे श्री स्वामी समर्थ महाराज निजानंद दिन सोहळ्याचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल.अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा ‘निजानंद दिन’ (पुण्यतिथी) सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, वरोरा यांच्या वतीने बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक राममंदिर देवस्थान येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी भक्तांच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे भूपाळीने होईल. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता विधिवत अभिषेक आणि १०.३० वाजता आरती करण्यात येईल. या आरतीला वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ अर्चना आशिष ठाकरे उपस्थित राहणार  आहे.दुपारी १२.०० वाजता भक्तांसाठी प्रसाद व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
🔴 सायंकाळी भव्य पालखी सोहळा
उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी ६.३० वाजता होणारी आरती आणि त्यानंतर होणारे पालखी पूजन. मान्यवरांच्या हस्ते होनार यात वरोरा -भद्रावती मतदार संघाचे आमदार श्री करणदादा देवतळे,कृषी बाजार समितीचे सभापती. श्री विजयराव देवतळे, लोक शिक्षण संस्था अध्यक्ष श्री श्रीकांत पाटील तसेच बाजार समितीउपसभापती श्री जयवंतराव टेमर्डे,संचालक बाळाभाऊ भोयर,खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष श्री विजयराव मोकाशी श्री विलास नेरकर उपस्थित राहनार.पालखीचे पूजन झाल्यानंतर शहराच्या मुख्य भागातून पालखी परिक्रमा काढण्यात येणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘श्री स्वामी समर्थ’ नामाच्या जयघोषात हा सोहळा संपन्न होईल.

👉”स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करण्याची ही सुवर्णसंधी आहे. वरोरा शहरातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या पवित्र सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन अक्कलकोट श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, वरोरा च्या वतीने करण्यात आले आहे.

थोडक्यात माहिती : -श्री स्वामी समर्थ महाराज निजानंद दिन सोहळा.
👉 बुधवार, १५ एप्रिल २०२६
👉 स्थळ :-  राममंदिर देवस्थान, वरोरा
👉 प्रमुख कार्यक्रम अभिषेक, भजन, महाप्रसाद आणि भव्य पालखी परिक्रमा.

🙏 जय विदर्भ 🙏