Home विदर्भ हिंगणघाट – वर्धा नदीवरील ३८ कोटींच्या पुलाचे  नितीन जी गडकरींच्या हस्ते होणार...

हिंगणघाट – वर्धा नदीवरील ३८ कोटींच्या पुलाचे  नितीन जी गडकरींच्या हस्ते होणार भूमिपूजन

हिंगणघाट :- अभिषेक किशोर भागडे ( वरोरा )
यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवर एका भव्य पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ आज , १२ एप्रिल २०२६ रोजी होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांतर्गत (CRIF) निधीतून मंजूर झालेल्या ३८ कोटी रुपयांच्या या पुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
🔴 आजन्सरा येथे भव्य सोहळा 🔴
हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथे सायंकाळी ५:०० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विकासकामामुळे वर्धा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक सोपे आणि जलद होणार असून, परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे.
🔴 प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी  🔴
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे भूषवणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत, ज्यात प्रामुख्याने:
ना. डॉ. अशोक उईके मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य.
ना. डॉ. पंकज भोयर राज्यमंत्री (गृह, शिक्षण, सहकार) तथा पालकमंत्री, वर्धा जिल्हा.
आमदार समीर कुणावार हिंगणघाट विधानसभा क्षेत्र.
आमदार सुमित वानखेडे आर्वी विधानसभा क्षेत्र.
आमदार राजेंद्र बकाने देवळी विधानसभा क्षेत्र.
मा. श्री. दादाराव केचे विधान परिषद सदस्य.
विकासाच्या दिशेने मोठे पाऊल
भारतीय जनता पार्टी, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामामुळे व्यापार आणि वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

🙏 जय विदर्भ 🙏