Home जिल्हा आवळपूर ग्रामपंचायत येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन.

आवळपूर ग्रामपंचायत येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन.

कोरपना (प्रतिनिधी): – लीलाधर काळे ( गडचांदूर )
सामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ (टप्पा क्र. १) अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर  शुक्रवार, १० एप्रिल २०२६  रोजी आवळपूर ग्रामपंचायत  येथे सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

🔴 महसूल प्रश्नांसाठी नोडल पथक सज्ज 🔴
नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी विशेष नोडल पथक 🔴

तयार करण्यात आले असून, अर्जांची आणि तक्रारींची त्वरित दखल घेतली जाणार आहे.
🔴शिबिरात मिळणाऱ्या प्रमुख सेवा 🔴
या समाधान शिबिरात खालील महत्त्वाच्या शासकीय कामांचा निपटारा करण्यात येणार आहे:
🔴७/१२ दुरुस्ती व वाटप 🔴

वारसान नोंदी करणे, जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करणे आणि डिजिटल ७/१२ उताऱ्यांचे वाटप.

🔴 शासकीय दाखले 🔴

उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आणि नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र.
🔴तक्रार निवारण 🔴

महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा.
🔴 शासकीय योजनांचा लाभ 🔴

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना आणि ‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत पट्टे वाटप.
🙏नागरिकांना आवाहन 🙏
हे शिबिर राजस्व मंडळ नांदा (तहसील कोरपना) अंतर्गत आयोजित करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी आपल्या संबंधित अर्जांसह आणि आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभाग आणि आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

🙏 जय विदर्भ🙏