नागपूर :- माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नागपूर आणि वर्धा येथे भव्य स्मारके उभारली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जामठा येथील व्हीसीए लॉनवर आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री बोलत होते. स्व. दत्ता मेघे यांनी स्थापन केलेल्या संस्थांच्या माध्यमातून आजवर जनसेवा सुरू आहे. आता ही स्मारके त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
लोकनेते दत्ताभाऊंनी गरिबांसाठी वाहून घेतले :- नितीन गडकरी.
यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दत्ता मेघे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “दत्ताभाऊ हे खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी होते. त्यांनी सामान्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली आणि लाखो लोकांना आधार दिला. राजकारणात असूनही त्यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य दिले, असे व्यक्तिमत्व दुर्मिळ असते.”
🔵 महत्त्वाचे मुद्दे 🔵
🔴 लोकनेते म्हणून ओळख 🔴 मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, दत्ता मेघे हे जनता आणि बहुजनांचे नेते होते. लोक त्यांना प्रेमाने ‘दत्ताभाऊ’ म्हणायचे, परंतु ते खऱ्या अर्थाने ‘दाताभाऊ’ होते.
🔴गुणवत्तेशी तडजोड नाही 🔴
आरोग्य, शिक्षण आणि सहकार क्षेत्रात संस्था उभ्या करताना त्यांनी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही.
🔴 सर्वपक्षीय उपस्थिती 🔴
या श्रद्धांजली सभेला विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मेघे परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी माजी मंत्री विलास मुत्तेमवार, नाना पटोले, जोगेंद्र कवाडे, अनिल देशमुख, समीर मेघे, सागर मेघे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनीच दत्ताभाऊंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
🙏 जय विदर्भ 🙏




