Home जिल्हा ⭕🙏 दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी एक ठार व 17 प्रवासी...

⭕🙏 दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी एक ठार व 17 प्रवासी जखमी 🙏⭕

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0265,0.0003; brp_del_sen:1.0000,1.0000; motionR: null; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2097152;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 386.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 33;

 

वरोरा : – भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळ आज (15 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी १२ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटाळा परिसरातील नागरिकांचा एक समूह मालवाहक वाहनातून भटाळा येथे बाण घेऊन दर्शनासाठी गेला होता. दर्शन संपवून परत आल्यानंतर हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात होते. दरम्यान एम.एच. 34 बी.झेड. 9478 क्रमांकाचे अशोक लेयलंड कंपनीचे मालवाहक वाहन, चालक रामा पांडुरंग जाधव यांच्या ताब्यात होते. राळेगाव परिसरात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पलटी झाले.
अपघात इतका जबर होता की वाहनातील प्रवासी चेंगराचेंगरीत जखमी झाले. यात भूषण विजय दोडके (वय १७, रा. पाटाळा) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.
सर्व जखमींना प्रथम वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने १२ जणांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये मयूर वनशिंगे (१६), राजू किसन शिवरकर (४२), राजू जाधव (४०), मंथन डाहूले (१३), लकी भडके (२०), नानाजी मरस्कोल्हे (७०), गणेश खापणे (४०), मारोती शिवरकर (४५), विनोद गौरकर (५०), रोशन माडवे (१७), मारोती बदखल (५०) आणि सोहम भोयर (१६) या १२ जणांचा समावेश असून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
किरकोळ जखमींमध्ये प्रवीण आवारी, गुरुवेश राजेश जाधव (१४), ओंकार शिवशंकर मांढरे (९), प्रतीक पारखी आणि रोहित झाडे यांचा समावेश आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पाटाळा व राळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. माजरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.