Home Breaking News ⭕🙏 भांदेवाडा येथे एकेरी मार्गामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आव्हान 🙏⭕

⭕🙏 भांदेवाडा येथे एकेरी मार्गामुळे पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आव्हान 🙏⭕

भांदेवाडा : सद्गुरु विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थान, भांदेवाडा यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. सध्या भांदेवाडा गावातील पुलाचे व रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे गावातून श्री जगन्नाथ बाबा मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता तात्पुरता एकेरी (One Way) करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर वणी-राजूर मार्गाकडून येणाऱ्या भाविक भक्तांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे राहील —
वणी – नांदेपेरा – वानोझादेवी – लखापूर – भांदेवाडा

बांधकाम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीतील बदल तात्पुरते स्वरूपाचे असून, सर्वांनी संयम राखून प्रशासन व संस्थानला सहकार्य करावे, असेही कळविण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य दिशादर्शक फलक व सूचना लावण्यात येणार आहेत.

सर्व नागरिक व भाविक भक्तांनी या सूचनेची नोंद घेऊन पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
🙏जय विदर्भ 🙏
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा.
☎️ 9673574711
☎️8329889732