वरोरा : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त माढेळी नाका येथील, शिवाजी वार्डातील जनतेच्या वतीने साबुदाणा खिचडी वाटपाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. भक्तीभाव, सामाजिक बांधिलकी आणि एकोप्याचा सुंदर मिलाफ या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
सकाळी 11 वाजे पासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. हजारो शिवभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. “हर हर महादेव”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. उपवास करणाऱ्या भाविकांसाठी पौष्टिक आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घेत तयार करण्यात आलेली साबुदाणा खिचडी भाविकांनी आनंदाने स्वीकारली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम न ठेवता समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न. शिवाजी वार्डातील नागरिक दरवर्षी अशा स्वरूपाचे समाजोपयोगी कार्यक्रम राबवून वरोराकरांसमोर एक आदर्श उभा करत आहेत. एकोपा, सेवा आणि श्रद्धा यांचा संगम साधत समाजासाठी सकारात्मक संदेश देण्याचे काम सातत्याने केले जात आहे.
या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. समाजासाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रमांची ही परंपरा भविष्यातही अशीच सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यात युवा पिढीचा मुख्य सहभाग आहे.
🙏जय विदर्भ 🙏




