
वरोरा : – मारडा रोडला ( कुणबी भवन जवळ )लागून असलेल्या नवीन हायवेवर आज सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास एक थरारक घटना घडली. श्री. प्रमोद पिंपळशेंडे (रा. वडगाव) हे आपल्या पत्नी व दोन लहान मुलांसह दुचाकी ने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच दुचाकी ला आगीच्या भक्ष्यस्थानी गेली.
सुदैवाने प्रसंगावधान राखत कुटुंबाने तात्काळ गाडी खाली उतरुन आपला जीव वाचवला. सर्वजण सुखरूप असले तरी गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही मिनिटांतच संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक धूर निघू लागल्यानंतर इंजिनमधून ज्वाळा उसळल्या आणि पाहता पाहता आग विकोपाला गेली. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे वाहनांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता वाढते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
🚨 समाजासाठी इशारा!
ही घटना केवळ अपघात नसून सर्व वाहनधारकांसाठी मोठा धडा आहे.
उन्हाळ्यात गाडीचे नियमित सर्व्हिसिंग करणे, इंजिन ऑईल, वायरिंग व कूलिंग सिस्टीम तपासणे अत्यावश्यक आहे.
तसेच वाहनात ज्वलनशील वस्तू ठेवणे टाळावे आणि प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासावी. 112 या नंबर वर फोन करतात घटनास्थळी वरोरा पोलीस स्टेशन चे कर्मचारी तात्काळ आले. व वरून नगरपरिषदेची अग्निशामक गाडी वेळेवर येऊन आगीवर नियंत्रण केले आहे.
“सावध राहा, सुरक्षित राहा” हा संदेश देणारी ही घटना आहे.
सुदैवाने एक मोठी जीवितहानी टळली; मात्र या घटनेने वाहन सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
🙏जय विदर्भ 🙏



