सोलापूर (Solapur) 16 फेब्रुवारी :-
पुणे व सोलापूर जिल्हा पोलिस तसेच महसूल प्रशासनाच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशय परिसरातील माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करून वाळूमाफियांच्या 13 बोटी पकडून जिलेटीनच्या सहाय्याने बोटी उद्ध्वस्त केल्या. या मोठ्या कारवाईने वाळूमाफियामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महसूल व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील माळवाडी जॅकवेल ते करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथे पाठलाग करून वाळूमाफियांच्या 13 बोटी पकडल्या व त्या सर्व बोटी बुडवून नष्ट केल्या. माळवाडी जॅकवेल जवळ तीन सक्शन बोट पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.




