महाराष्ट्राच्या प्रगतीची केली कामना
मुंबई (Mumbai) :- राज्यभर आज गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. सर्वसामान्य नागरिक, कलाकार ते राजकारणी आणि सेलिब्रेटींनी आपल्या घरी गणेशाची प्रतिष्ठापणा (Ganesh Chaturthi) केली.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी विधीवत गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आई, पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजासह इतर कुटुंबीय उपस्थित होते..दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठापना केली. आज माझ्या मुंबई येथील निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले असं फडणवीसांनी ट्वीट केलं व आपल्या राज्यासमोर आणि देशासमोर जी विघ्नं आहेत ती गणेशाचं वंदन केलं की दूर होतात अशा भावना यावेळी फडणवीसांनी बोलून दाखवल्या.




