8 November 2026News Website

Flag Hoisiting Record : 15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकणार पीएम नरेंद्र मोदी

लाल किल्ल्यावर रचणार विक्रम

देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. आपण यंदा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. यानिमित्ताने हर घर तिरंगा ही मोहिमसुद्धा देशभरात राबवली जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पंतप्रधान सलग नरेंद्र मोदी (Narendra Modi) अकराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांनी सलग 10 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला होता. यंदाच्या 15 ऑगस्टला डॉ. मनमोहन सिंग यांना मागे टाकत पीएम नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर विक्रम रचतील. लालकिल्ल्यावर सर्वाधिक तिरंगा फडकावण्याचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. नेहरू यांनी 17 वेळा लालकिल्ल्यावर ध्वजारोहण केलं होतं. तर इंदिरा गांधी यांच्या नावावर 16 वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याचा विक्रम आहे.

swatantravidarbhanewsportal.com