8 November 2026News Website

‘या शहरात’ कारचा अपघात; दोन युवकांचा जागीच मृत्यू

सोलापूर 14 जून :-वेगाने कार चालविताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला कार धडकल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी झाले. ही घटना अकलूज शहरातील महर्षि चौक ते गिरझणी चौकादरम्यान घडली. याबाबतची माहिती सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी माध्यमांना दिली.

शुभम बाळू चव्हाण (वय २३), यश नवनाथ शिंदे (वय २०, दोघे रा.वेळापूर), राहुल बापूसाहेब कोळेकर (वय २४, रा.उघडेवाडी) व समाधान बुवा सरतापे (वय २३, रा.खुडुस ता.माळशिरस) हे चौघे मित्र चाकी गाडीत महर्षि चौकातून जयसिंह चौकाकडे वेगाने निघाले होते. त्यावेळी वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अनियंत्रित झालेली गाडी एम.एच.४५ एन.०००८ ही रस्त्यालगत असणाऱ्या दोन झाडांना धडकली.

अभिषेक किशोर भागडे