Home क्राईम चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बल्लारशा हद्दीत ५,५२,००० रुपयांचा अवैध विदेशी...

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बल्लारशा हद्दीत ५,५२,००० रुपयांचा अवैध विदेशी दारूचा साठा व कार जप्त.

चंद्रपूर, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ :- स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत बल्लारशा पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना रंगेहात पकडले. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ९१८/२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) आणि ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



💥 कारवाईतील मुद्देमाल व तपशील💥
🟨 आरोपी
1. नागेश पोचणा पाकूळवार (वय ३८ वर्षे, रा. भेंडवी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर)
2. मुरली वेंकटाद्री पचवा (वय २९ वर्षे, रा. भेंडवी, ता. राजुरा)
🟨 जप्त वाहन :- रेनो डस्टर कार (क्र. MH 40 AC 9855) – किंमत अंदाजे ५,००,०००/- रुपये
🟨 जप्त मद्यसाठा
⭕  सह्याद्री विस्की (९० मिली चे १०० नग) – किंमत १०,०००/- रुपये
⭕  रॉयल स्टॅग विदेशी दारू (१८० मिली च्या ४८ शिश्या) – किंमत १२,०००/- रुपये
⭕  रॉयल स्टॅग विदेशी दारू (९० मिली च्या २०० शिश्या) – किंमत ३०,०००/- रुपये
🟨 एकूण जप्त मुद्देमाल :- ५,५२,०००/- रुपये
सदर धडक कारवाई उपविभाग राजुरा येथील स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने पार पाडली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.