Home जिल्हा भारतीय जनता पार्टी वरोरा आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा हजारो...

भारतीय जनता पार्टी वरोरा आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा हजारो महिलांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात संपन्न!

वरोरा :- बंध, आपुलकी व स्नेहाचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधन निमित्त भारतीय जनता पार्टी वरोरा आणि भारतीय जनता पार्टी महिला आघाडी वरोरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्नेहसोहळ्याला वरोरा आणि परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



कार्यक्रमाची सविस्तर माहिती व महत्त्वाचे मुद्दे

वेळ व दिनांक :- हा भव्य सोहळा आज रविवार, दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक २:०० वाजता दिमाखात सुरू झाला. स्थळ :-सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे हा कार्यक्रम पार पडला.
प्रमुख उपस्थिती :- कार्यक्रमास मा. हंसराजजी भैय्या अहिर (माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री) व करणदादा संजय देवतळे (वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार), सौ. वेदानंती करणदादा देवतळे,सौ. आसावरी देवतळे (महिला बालकल्याण सभापती) यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते डॉ. विजय देवतळे (माजी जिल्हा परिषद सदस्य) विजय मोकाशी, विठ्ठलराव लेडे, शंभुनाथजी वरर्गणे (वरोरा नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य),कन्हैयालाल जयस्वाल, किशोरभाऊ बावणे, वरोरा शहराचे शहराध्यक्ष व नगरसेवक संतोष पवार व इतर नगरसेवक, नगरसेविका तसेच पक्षाचे इतर सन्माननीय सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



भारतीय जनता पार्टी महिला आघाडीबद्दल थोडी माहिती व उत्तम कामगिरी 
भारतीय जनता पक्षाची महिला शाखा म्हणून ‘महिला आघाडी’ ही संघटना महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणासाठी अत्यंत सक्रियपणे कार्यरत असते. स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत महिलांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांमध्ये आपुलकी आणि संघटन वाढवणे हे या आघाडीचे मुख्य उद्दिष्ट असते. वरोरा येथे ही महिला आघाडीच्या माध्यमातून असे अनेक प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जातात. या कार्यक्रमांमध्ये विशेष मेहनत घेतली आहे व जास्तीत जास्त महीलाना सहभाग करुन या कार्यक्रमाची व पक्षा ची मजबुतीचे वाढवण्याचे उत्तम कार्य केले आहे.या रक्षाबंधन सोहळ्यामुळे वरोरा शहरात एक चैतन्यमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.