Home Breaking News ५४ वर्षा जुनी धोकादायक पाण्याची टाकी अखेर जमिनदोस्त; नगरसेविका सौ. रोशनी संदीप...

५४ वर्षा जुनी धोकादायक पाण्याची टाकी अखेर जमिनदोस्त; नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांच्या पाठपुराव्याला यश.

वरोरा :- शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, वरोरा नगरपरिषदेच्या हद्दीतील ५४ वर्षे जुनी आणि अत्यंत जीर्ण झालेली धोकादायक पाण्याची टाकी नुकतीच यशस्वीरित्या पाडण्यात आली आहे. नवीन पाण्याच्या टाकीला लागूनच असलेली ही जुनी टाकी मुळे कोणतीही अनर्थकारी दुर्घटना घडू नये, यासाठी नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांनी तातडीने पावले उचलत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांच्या जीविताची तसेच बाजूला सरकारी दवाखाना आहे दररोज हजारो विद्यार्थी त्या रोड वर  येणे जाणे करते.सुरक्षितता धोक्यात आल्याचे लक्षात घेताच, सौ. रोशनी भडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून या गंभीर प्रकरणाची पाहणी केली. या ठिकाणी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात अथवा धोकादायक बांधकाम पूर्णपणे पाडण्यात यावे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
नगरसेविकांच्या या पाठपुराव्यानंतर वरोरा नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली. नवीन पाण्याच्या टाकीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या मागील दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी सलग काम चालवले गेले. या अत्यंतिक कौशल्याच्या आणि हुशारीच्या जोरावर काल रात्री ५४ वर्षांपूर्वीची ही धोकादायक टाकी यशस्वीरित्या जमिनदोस्त करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ.अर्चना ठाकरे नगर परिषदेचे मुख्यअधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी विशेष लक्ष देऊन या धाडसी आणि प्रशंसनीय कारवाईमुळे परिसरातील मोठा संभाव्य धोका टळला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी दाखवलेली ही तत्परता आणि उत्कृष्ट प्रशासकीय नियोजनाबद्दल वरोरा नगरपरिषद प्रशासन तसेच नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांच्या कामगिरीचे वरोरा वासीयांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.