केळापूर :- आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या विशेष प्रयत्नांतून श्री जगदंबा देवस्थानच्या विकासासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या विकासनिधीबद्दल देवस्थान समिती, विश्वस्त मंडळ आणि समस्त नागरिकांच्या वतीने आमदार तोडसाम यांचा नुकताच अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला.
केळापूर येथील ऐतिहासिक श्री जगदंबा देवस्थानच्या परिसरात आयोजित या सत्कार सोहळ्याला भाविक व नागररीकाची मोठी उपस्थिती होती. देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येणाऱ्या भाविकांना अत्याधुनिक व उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार तोडसाम यांनी शासनाकडून हा निधी खेचून आणला आहे. याबद्दल उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आभार मानले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम म्हणाले की, “श्री जगदंबा मातेच्या पावन चरणी सेवा करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याची व अभिमानाची बाब आहे. देवस्थानचा कायापालट करणे, भाविकांसाठी सुखसोयी निर्माण करणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध असून यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.”
या भव्य सत्कार सोहळ्यामुळे केळापूर परिसरात आनंदाचे वातावरण असून, देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने आणि समस्त नागरिकांनी आमदार तोडसाम यांच्या विकासकामांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.




