Home Breaking News वरोरा पोलिसांची धडक कारवाई! बकरे चोरी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश; ५...

वरोरा पोलिसांची धडक कारवाई! बकरे चोरी प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पर्दाफाश; ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त.

वरोरा :- शहरात आणि परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी वरोरा पोलिसांनी अत्यंत आक्रमक आणि धडक पावले उचलत, बकरी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत यशस्वी खुलासा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन अट्टल चोरांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून चोरेस गेलेली बकरे आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी असा एकूण ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी पो. स्टे. वरोरा येथे फिर्यादी किशोर अशोक कोल्हे (रा. मजरा(रै.), ता. वरोरा) यांनी तक्रार दिली होती की, त्यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेली २५,००० रुपये किमतीची ५ बकरे अज्ञात चोरांनी रात्रीच्या सुमारास लांबवली. या प्रकरणी वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलिसांची धडक कारवाई आणि वेगाने तपास
गुन्हा दाखल होताच वरोरा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरातील हायवे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले व खबऱ्यांचे जाळे पसरवून गोपनिय माहिती गोळा केली. या चक्रव्युहात अडकून पोलिसांनी खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले.
सुरज शिवगीरी सोळंकी  (वय २७ वर्ष, रा. इंदिरा नगर, अयोध्या नगर, चंद्रपूर)
खुबलाल हिरासिंग ठाकुर (वय २५ वर्ष, रा. संजय नगर, दर्गा वार्ड, चंद्रपूर)
राकेश राजेंद्र महतो (वय ३८ वर्ष, रा. शाम नगर, आंबेडकर चौक, बंगाली कॅम्प, चंद्रपूर)
पोलिसांनी तिघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी बकरे चोरी केल्याची कबुली दिली.



जप्त केलेला मुद्देमाल (एकूण ५,७०,००० रुपये)
१. ५ नग बकरे (किंमत २५,००० रुपये)
२. स्विफ्ट डिझायर चारचाकी कार (क्रमांक एम.एच. १२ एफ.यु. ८८१९, किंमत ५,००,००० रुपये)
३. होंडा मोटरसायकल (क्रमांक एम.एच. ३४ सी.सी. ४३५४, किंमत ४५,००० रुपये)
पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक :-अतिशय कष्टाने आणि जिद्दीने वाढवलेली बकरे अवघ्या २४ तासांच्या आत सुरक्षित परत मिळाल्यामुळे फिर्यादीने वरोरा पोलिसांच्या तत्परता, मेहनत व प्रभावी कारवाईबद्दल तीव्र समाधान व्यक्त केले आहे.सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि प्रभारी अधिकारी ओमप्रकाश सोलटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरद भसमे, पोउपनी मनिष तालेवार, आणि पोलीस स्टाफ सुकराज यादव, अमोल नवघरे, प्रशांत नागोसे, महेश गावतुरे, सौरभ कुलते, विशाल राजुरकर, मनोज ठाकरे यांच्या विशेष पथकाने पार पाडली आहे. वरोरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.