Home क्राईम कुख्यात महाठग विनोद सोयाम 31 पर्यंत पोलीस कोठडीत! रॅकेटचा लवकरच होणार पर्दाफाश.

कुख्यात महाठग विनोद सोयाम 31 पर्यंत पोलीस कोठडीत! रॅकेटचा लवकरच होणार पर्दाफाश.

वरोरा :- नागरिकांना नोकरीचे आमिष, सोने विक्री आणि बनावट नोटांच्या गोरखधंद्यात कोट्यवधी रुपयांचा चुना लावणारा कुख्यात महाठग विनोद सोयाम याला आज वरोरा पोलिसांनी न्यायालयात खडा केले. न्यायालयाने त्याला 31 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ – ३(५) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ – ३१८(४)या दरोडेखोराच्या जाळ्यात आणखी कोणकोणते मोठे मासे व सहकाऱ्यांचा समावेश आहे, याबाबत आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.



💥 अशी होती ठगाची नवी मजल 💥
आरोपी विनोद सोयाम याने नागपूरमधील व्यापाऱ्यांसह अनेक सामान्य नागरिकांना विविध प्रलोभने दाखवून मोठी आर्थिक फसवणूक केली होती. त्याच्या ठकबाजीचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे होते:
नोकरीचे आमिष :- सरकारी व खाजगी नोकरी लावण्याच्या नावाखाली तरुणांची आर्थिक फसवणूक करणे.
सोन्याची बतावणी :-स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणे.
बनावट नोटांचा गोरखधंदा :- पैशाचे पाकीट दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणे.
या सर्व गुन्ह्यांमध्ये तो कोट्यवधी रुपयांची माया जमवून फरार झाला होता आणि सतत आपले बस्तान बदलून पोलिसांना चकमा देत होता.



पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई व न्यायालयाचा दणका 31 पर्यंत पोलीस कोठडी 
आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने वरोरा पोलिसांनी तांत्रिक व सायबर सेलच्या मदतीने मध्य प्रदेशातील इंदूरपर्यंत माग काढत त्याला अटक केली होती. आज त्याला वरोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या कोठडीदरम्यान त्याच्या संपर्कातील इतर साथीदारांची नावे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कोट्यवधी रुपयांचे रॅकेट एकटा व्यक्ती चालवणे अशक्य असल्याने, या गुन्ह्यामागे मोठे आंतरजिल्हा व आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता बळावली आहे. बनावट नोटांचे वितरण आणि सोन्याची बतावणी करण्यामागे काही पांढरपेशा व स्थानिक म्होरक्यांचा हात असण्याची शक्यता असून, पोलीस कोठडीतील चौकशीत अनेकांचे बुरखे फाटणार आहेत.