वरोरा :-एन. के. पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र, लता मंगेशकर हॉस्पिटल (डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर) यांच्याद्वारे आणि डॉ. सागर वझे यांच्या सुयोग हॉस्पिटल, इंदिरा गांधी मार्ग, वरोरा येथे आयोजित ‘मोफत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिर’ अतिशय शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडले.
या शिबिराला वरोरा परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून, एकूण १०१ रुग्णांनी विविध आजारांची तपासणी करून घेतली. यामध्ये.
💥 न्यूरोलॉजी विभाग :- 80 रुग्णांनी न्यूरोलॉजी विभागांतर्गत तपासणी केली.
💥 नेफ्रोलॉजी विभाग:- 21 रुग्णांनी नेफ्रोलॉजी विभागांतर्गत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. स्वप्रेश चिंधालोरे (एमबीबीएस, एमएस, एमसीएच – न्युरोसर्जन) आणि डॉ. मोहित कुुरुंदवाडकर (एमबीबीएस, एमडी, डीएनबी – नेफ्रोलॉजिस्ट) यांनी बिगरखर्च रुग्णांची कसून तपासणी केली व योग्य ते वैद्यकीय मार्गदर्शन केले.
डॉ. सागर वझे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. गरीब आणि गरजू जनतेपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी यापुढेही दरमहा अशाच प्रकारचे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जातील, असे आश्वासन आयोजकांच्या वतीने यावेळी देण्यात आले. “आपले आरोग्य, आमची जबाबदारी” या ब्रीदवाक्यानुसार झालेल्या या उपक्रमामुळे परिसरातील सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले आहे.




