वरोरा :-पोलिस प्रशासनाच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण वरोरा शहरात समोर आले आहे. घरातून अचानक निघून गेलेल्या १५ वर्षीय मुलाला वरोरा पोलिसांनी केवळ ३० मिनिटांच्या आत शोधून काढून त्याच्या पालकांच्या सुपूर्द केले आहे. पोलिसांच्या या झटपट कारवाईमुळे एका चिंतेत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
🙏नेमकी घटना काय 🙏
प्राप्त माहितीनुसार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४:४५ वाजताच्या सुमारास, सुमित किशोर गांधी (रा. टीळक वार्ड , वरोरा) यांचा १५ वर्षीय मुलाचे नाव वेदांत सुमित गांधी हा अचानक घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. मुलगा अल्पवयीन असल्याने आणि अचानक बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांवर वॉर्डात आणि परिसरात एकच तोडगा व चिंता पसरली.
💥 पोलिसांची तडफदार कारवाई 💥
कुटुंबीयांनी तात्काळ वरोरा पोलीस स्टेशन गाठून यासंदर्भात माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मा. ओमप्रकाश सोनटक्के साहेबाच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे हलवली. मदन येरणे /103,पोलीस दत्ता थिटे/589, सादिक /386 वाहन चालक यांनी कोणतीही वेळ वाया न घालवता तातडीने शोधमोहीम सुरू केली.पोलिसांच्या या पथकाने अवघ्या अर्ध्या तासाच्या (३० मिनिटांच्या) आत हरवलेल्या वेदांतचा शोध घेतला आणि त्याला सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
💥 पालकांकडून मानले आभार 💥
पोलिसांच्या या तत्पर, संवेदनशील आणि धडाकेबाज कामगिरीमुळे अनर्थ टळला असून, पालकांनी वरोरा पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. कठीण प्रसंगात पाठीशी उभे राहणाऱ्या वरोरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




