Home जिल्हा वरोरा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचा सत्कार 

वरोरा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचा सत्कार 

वरोरा :- वरोरा शहर शांतता समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे वरोरा शांतता समितीचे सदस्य,पत्रकार ,डिजिटल मीडिया च्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उत्साहात सत्कार करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला खासदार, आमदार, नगराध्यक्ष, विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी, पोलीस पाटील, नागरिक तसेच मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.



कारकिर्दीचा गौरव व अवैध धंद्यांवर कारवाईचा धाक आयुष नोपानी यांनी यापूर्वी वरोरा-भद्रावती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सलग तीन वर्षे उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. या काळात त्यांनी क्षेत्रातील अनेक अवैध धंद्यांना आळा घालायचे काम केले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना वठणीवर आणले.आता ते संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत असून, संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वचक निर्माण करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळत आहे.



जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळल्यानंतर आयुष नोपानी यांचे वरोरा शहरात प्रथमच आगमन झाले. या औचित्या साधून वरोरावासियांच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कणखर आणि आक्रमक भूमिकेमुळे शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, नागरिकांमधून त्यांच्या या सत्काराबद्दल व कामाबद्दल मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.