वरोरा :- समाजात धार्मिक व आध्यात्मिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि संस्कृतीची जोपासना करत, रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात व चैतन्यमय वातावरणात रेल्वे स्टेशन चौकातील ऐतिहासिक नागमंदिरात विशेष पूजन सोहळा पार पडला. “हर हर महादेव” च्या जयघोषाने आणि दुमदुमलेल्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात एक वेगळाच आध्यात्मिक जोश पाहायला मिळाला.
दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला पूजन सोहळा
नागपंचमीच्या पवित्र सणानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमात व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोभावे नागदेवाचे दर्शन व पूजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सखाराम पाऊलकर यांनी भूषवले. यावेळी त्यांच्यासह दत्तू ठाकरे, अमित घोडमारे, लखन केशवाणी, जब्बर भाई शेख, सुरज केशवाणी, तेजस चौधरी, महादेव झाडे, रामभाऊ धोटे आणि अशोक पदाते यांच्यासह व्यापारी मंडळातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
धार्मिक मूल्यांचा प्रसार व्हावा, व्यापार जगतासोबतच समाजात अध्यात्मिक ऊर्जा आणि सलोखा वाढीस लागून तरुणाई व नागरिकांमध्ये धार्मिक भावना प्रगल्भ व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश होता. पूजन झाले
तसेच, या धार्मिक महोत्सवाची सांगता अधिक गोड करण्यासाठी आज दिनांक 18/08/2026 ला सकाळी ठीक 12:00 वाजता रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे नागरिकांसाठी ‘मसाला भात‘ वाटपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे स्टेशन व्यापारी मंडळातर्फे करण्यात आले आहे. या धडाकेबाज आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे व्यापारी मंडळाच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.




